शिंदे आणि ठाकरे यांच्यातील वाद सुरु असताना निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवलं आहे. येत्या पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अर्थातच धक्कादायक आहे. याच संदर्भांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षासाठी ३ नवीन नाव आणि ३ पक्षचिन्ह सुचवली आहेत.